adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम.. जळगावात कोळी जमातीचा सामुहिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न..

 कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम.. जळगावात कोळी जमातीचा सामुहिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न.. जळगाव प्रतिनिधी (संपादक -:-...

 कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम..

जळगावात कोळी जमातीचा सामुहिक विवाह सोहळा थाटामाटात संपन्न..


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव:- येथील कोळी समाज बहुउद्देशीय प्रतिष्ठान व दानशूर व्यक्तींच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे ह्यावर्षीही कोळी लोकांच्या मुला-मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यात सहा जोडप्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. समाजातील ज्या गरीब गरजू कुटुंबातील मुला मुलींची लग्न आर्थिक परिस्थिती अभावी होऊ शकत नाहीत, त्यांची विवाह थाटामाटात लावून देण्याचा संकल्प मंडळाचा असतो. याप्रसंगी वधू-वर यांना भारी कपडे बूट चप्पल संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्यात. वधुवरांची सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. विवाह प्रसंगी सर्वस्तरातील हज्जारों समाज बांधवांची उपस्थिती होती. जेवणात  जळगावची खासियत वरण बट्टी भात भाजी शिरा अशी पंगत होती. प्रतिष्ठानने आतापर्यंत चार वर्षांत ५१ पेक्षाही जास्त जोडप्यांची लग्न एक रूपयाही न घेता मोफत लावून दिलेली आहे. 

          ह्या कार्यासाठी जळगावचे माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे यांची प्रेरणा तर चोपडा कोळी मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभत असते. हा विवाह सोहळा यशस्वीतेसाठी अध्यक्ष रवी कोळी, उपाध्यक्ष संजय बाविस्कर, सचिव अनिल कोळी, खजिनदार सुधाकर बाविस्कर, ज्येष्ठ सल्लागार गोकुळ सूर्यवंशी, संचालक दीपक कोळी, रतन बिऱ्हाडे, शिवाजी सूर्यवंशी, गणेश बाविस्कर, प्रा.भाऊसाहेब सोनवणे, अक्षय सोनवणे, नरेंद्र सपकाळे, निश्चलदास साळुंखे, दिलीप कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.

.......,.....................................................

 पुढील वर्षी खान्देशस्तरीय विवाह सोहळ्याचे आयोजन..

आतापर्यंत जळगाव मर्यादित हा विवाह सोहळा व्हायचा. पुढील वर्षी हा सोहळा खान्देशस्तरीय करावा, असा संकल्प प्रतिष्ठानने केलेला आहे. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपावी व गरीब गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी राबविला जातो. समाज बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा..

 जगन्नाथ बाविस्कर, मार्गदर्शक 

(सामूहिक विवाह सोहळा समिती जळगाव)

No comments