महावितरण वीजतारा चोरी प्रकरणी शेतकरी आक्रमक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक ...
महावितरण वीजतारा चोरी प्रकरणी शेतकरी आक्रमक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर : मलकापूर व नांदुरा तालुक्यात गेल्या एक वर्षापासून शेतातील महावितरणच्या विद्युत तार चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, शेतकरी वर्गात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, मलकापूर शहर पोलीस स्टेशन, मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच MIDC पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत 15 ते 20 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र अद्याप मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांच्या विहिरी व पंपाची वीजपुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली आहे. चोरीमुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून पिकांच्या लागवडीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “वीजतारा चोरीमागील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा दिला. प्रशासनाने तातडीने संयुक्त पथक तयार करून चोरीचा बंदोबस्त करावा, रात्रीच्या गस्तीत वाढ करावी तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या निवेदनावर मलकापूर व नांदुरा तालुक्यातील विविध गावांतील शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे, मलकापूर तालुकाध्यक्ष गोपाल सातव, नांदुरा तालुकाध्यक्ष रामदास डोसे, युवक तालुकाध्यक्ष नांदुरा गोलू पाटील, भरत शेठ दंड, विशाल पटेल, मयूर पाटील, नीना कोलते, छोटू नारखेडे, संतोष चव्हाण, महादेव ठाकरे, परमेश्वर खापोटे, मंगेश खापोटे, रवींद्र खरसणे, सतीश पाटील, सुरेश बोंद्रे, दिलीप कायकुटे, सुरेश वानखेडे, निळकंठ खाचणे, धनराज सपकाळ, अमोल पानपाटील, शेख महबूब, शेख रौफ, शेख सय्यद इरफान, शेख सय्यद, योगेश लांजुलकर, बबलू देशमुख, अरुण नारखेडे, संजय पाटील, कैलास मोरे, महादेव कोंडे, नामदेव कोंडे, कळू कांडेलकर, विनायक सपकाळ, प्रमोद सपकाळ, शुभम टकले, दीपक पाटील, भास्कर पाटील, संजय नारखेडे, किशोर खर्ची, संदीप पाटील, सारंग खर्चे, अजय भगत, अनंता खर्चे, मुनसिंग खान, शेख आयुब, शेख अहमद, महादेव ठाकरे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

No comments