चोपडा वनक्षेत्रपाल बी. के. थोरात यांची पिंपळनेर येथे बदली चार वर्षांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी; वनविभागात बदल्यांची घोषणा विश्राम त...
चोपडा वनक्षेत्रपाल बी. के. थोरात यांची पिंपळनेर येथे बदली
चार वर्षांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी; वनविभागात बदल्यांची घोषणा
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामार्फत नुकत्याच वनक्षेत्रपालांच्या नियतकालिक बदल्या जाहीर करण्यात आल्या असून राज्यभरातील एकूण 216 वनक्षेत्रपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये चोपडा वनपरिक्षेत्रात सलग चार वर्षांपासून कार्यरत असलेले वनक्षेत्रपाल बी. के. थोरात यांची पिंपळनेर पश्चिम घाट वनक्षेत्र येथे बदली करण्यात आली आहे.
बी. के. थोरात यांनी आपल्या कार्यकाळात चोपडा वनपरिक्षेत्रातील लासुर, सत्रासेन आणि उमर्टी या तीनही राउंडमध्ये उल्लेखनीय कार्य केले. वनसंवर्धन, वनक्षेत्र संरक्षण तसेच प्रशासनिक कामकाजात त्यांनी प्रभावी कामगिरी बजावत विभागात वेगळी ओळख निर्माण केली.
त्यांच्या कार्यकाळात विविध विकासात्मक आणि संरक्षणात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. स्थानिक नागरिकांशी समन्वय साधत वनसंरक्षणाबाबत जनजागृती करण्याचे कामही त्यांनी यशस्वीपणे केले असल्याची भावना वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बी. के. थोरात यांच्या बदलीनंतर चोपडा वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांकडून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

No comments