अंतुर्ली तापी तीरावरील जुनी स्मशान भूमीचे काम कधी होणार? अंतुर्ली प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) अंतुर्ली गाव मोठे असून गावात दोन स्म...
अंतुर्ली तापी तीरावरील जुनी स्मशान भूमीचे काम कधी होणार?
अंतुर्ली प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
अंतुर्ली गाव मोठे असून गावात दोन स्म्शानभूमी आहेत, नवीन स्म्शानभूमी झाल्याणे ग्रा,पं, प्रशासनाने जुन्या तापीतिरावरील स्म्शान भूमी कडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे,तेथील रस्त्यावर कायम पाणी वहात असल्यामुळे सिमेंट रस्ता खराब होत आहे खाली उतरल्यावर एका ठिकाणी मोठी मोरी असून तेथे पाईप टाकणे आवश्यक आहे, आजूबाजूला असलेली गटार तुडुंब भरून कचरा साचलेला आहे, आजूबाजूला गवत वाढल्याने जेसीबी वापरून सफाई आवश्यक आहे, यापूर्वी असलेले जाळी कपाउंड व प्रवेश द्वार गेट गायब झाले कोणी नेले हे माहिती असून नागरिक गप्पच, तापीतिरावरील जागा ही जेसीबी नें स पा टीकरण करणे आवश्यक, व पावसाळ्यात तिरावर पूर्ण वाढीची वड ,पिंपळ, कडुलिंब झाडें लावणे आवश्यक, तापी काठ हा पवित्र मानला जाऊन वार्ड नं 1 व 2 मधील प्रेत तेथे आठ महिने हिवाळा व उन्हाळ्यात दहन विधी साठी नेतात, काही लोक मृत्यू पूर्व इचछा प्रकट करतात की तापीकिनारी च विधी व्हावेत तर ग्रा.पं, प्रशासनाने याठिकाणी आवश्यक त्या सुधारणा कराव्यात तसेच सार्वजनिक हौद ते दोधा नावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे ही जेसीबी लावून रुंदीकरण व एक ठिकाणी पाईप टाकून, दोन्ही फरश्यावर (राम मंदिर कडून एक फरशी व कुंड कडील फरशी )सिमेंट काँक्रे्टीकरण केल्यास व दु तरफा सफाई झाल्यास पावसाळ्यात नागरिकांना त्रास होणार नाही, ग्रा, पं प्रशासनाने हो अथवा नाही उत्तर द्यावे, नकार असल्यास नागरिक लोकवर्गणी करून ही कामे करतील, असा त्रागा येऊन बोलण्याचे कारण आतापर्यंत 10 व हे 11 वे काम सांगून सर्व कामां ना हो हो म्हणून केराची टोपली दाखविली, अंतुरली येथील नागरिकांची तापी तीरावली स्मशानभूमीची इच्छा पूर्ण करावी अशी मागणी केली आहे.

No comments