भुसावळातील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार सुरज पाटील यांचा पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित..... जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील (संपादक -...
भुसावळातील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार सुरज पाटील यांचा पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित.....
जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील
(संपादक - हेमकांत गायकवाड)
भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार सुरज पाटील यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस महासंचालकांचे पदक लावून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांची उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन त्यांनी मुंबई पोलीस दलातून सेवा बजावून 2007 साली जळगाव जिल्ह्यात बदली करून आलेल्या सुरज पाटील यांनी गेल्या 20 वर्षांपासून जिल्हा पोलीस दलात सेवा दिली
त्यांनी आतापर्यंत एमआयडीसी, एलसीबी, जळगाव, भुसावळ पोलीस उपअधीक्षक कार्यालयात सेवा बजावली त्यांनी विविध गुन्ह्यांचा तपास करताना चोरी, घरफोडी, दरोडा, मर्डर तसेच फसवणूक सारखे गुन्हे उघडकीस आणले त्यांच्या या कामगिरीची विशेष दखल घेऊन त्यांना महासंचालक पदक जाहीर करण्यात आले व त्यांना महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील, व जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्याहस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले. व पूर्ण जिल्ह्याभरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले . व त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आले


No comments