adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सनपुले ग्रामपंचायत पोटनिवडणूक: निवृत्ती कोळी सरपंचपदी विजयी

 सनपुले ग्रामपंचायत पोटनिवडणूक:  निवृत्ती कोळी सरपंचपदी विजयी  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा:- तालुक्यातील सनपुले येथील...

 सनपुले ग्रामपंचायत पोटनिवडणूक:  निवृत्ती कोळी सरपंचपदी विजयी 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:- तालुक्यातील सनपुले येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवृत्ती सुभाष कोळी यांनी विजय मिळवत अवघ्या २३ व्या वर्षी सरपंचपद पटकावले. त्यांच्या या विजयामुळे संपूर्ण गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, युवकांमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे.

सनपुले येथील माजी सरपंच पुंजू अर्जुन कोळी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत निवृत्ती कोळी यांना ३३४ मते मिळाली, तर त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी बाळू भिल यांना ३२६ मते मिळाली. त्यामुळे केवळ ८ मतांच्या अल्प फरकाने निवृत्ती कोळी विजयी झाले. इतर उमेदवारांमध्ये अरुण कोळी यांना २६०, केशरबाई भिल यांना ४७ मते मिळाली, तर १३ मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली. एकूण ९८० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणुकीकडे संपूर्ण चोपडा तालुक्याचे लक्ष लागले होते. विशेषतः निवृत्ती कोळी आणि बाळू भिल यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची ठरली. अखेर अटीतटीच्या या संघर्षात निवृत्ती कोळी यांनी विजय मिळवत पहिल्याच प्रयत्नात सरपंचपदावर आपली छाप पाडली.

विजयानंतर संपूर्ण सनपुले गावात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. गावातील महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करून त्यांचे स्वागत केले, तसेच विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. परिसरातूनही त्यांच्या या यशाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

दरम्यान, नवनिर्वाचित सरपंच निवृत्ती कोळी यांनी गावातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले. “गावातील गटारी, पाणीपुरवठा, घरकुल योजना, रस्ते तसेच स्मशानभूमीच्या रस्त्यासारखी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

No comments