adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालयाचा दहावीचा निकाल ७५ टक्के प्राची सैंदाणे प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक

 पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालयाचा दहावीचा निकाल ७५ टक्के प्राची सैंदाणे प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक  चंद्रकांत पाटील...

 पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालयाचा दहावीचा निकाल ७५ टक्के

प्राची सैंदाणे प्रथम; गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक 


चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 अनवर्दे/बुधगाव:-  येथील आपल्या ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित पंडितराव त्र्यंबकराव साळुंखे विद्यालय चा फेब्रुवारी २०२६ दहावी परीक्षेचा निकाल ७५ टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

या निकालात कु. प्राची सैंदाणे हिने ८४.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. स्वप्नील शिरसाठ याने ८२.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर कु. पूजा बहारे हिने ७६.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यालयातील ५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक भुपेश धनगर सर, सर्व विषय शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल मुख्याध्यापक बळवंत सोनवणे सर, संस्थेचे चेअरमन प्रविण सुभाषराव साळुंखे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगन्नाथ बोरसे तसेच सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले आहे.

No comments