चोपड्यात दाऊदी बोहरा समाजातर्फे तळपत्या उन्हात थंडगार सरबत वाटप.. सेवाभावी उपक्रमाने नागरीकांच्या मनातुन उफाळला "मानवतेचा गारवा" ...
चोपड्यात दाऊदी बोहरा समाजातर्फे तळपत्या उन्हात थंडगार सरबत वाटप..
सेवाभावी उपक्रमाने नागरीकांच्या मनातुन उफाळला "मानवतेचा गारवा"
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:- येथील दाऊदी बोहरा समाजातर्फे रखरखत्या उन्हाचे चटके मानवी शरीरास बसत असल्याचे हेरून परोपकारी वृत्ती जोपासत सेवा भावाने सर्व सामान्य नागरिकांसाठी कडक उन्हात बांधकाम इंजिनिअर अनिसभाई बोहरी यांच्या नेतृत्वात आझाद चौक व श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्ञचौकात सरबत वाटप कार्यक्रम राबवून मानवी मनाला गारवा देण्याचा अनोखे ण केले.
जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 डिग्री पोहचल्याने या जीवघेण्या उन्हाळ्याच्या तडाक्याने सर्व सामान्य जनता होरपळत आहे.त्यामुळे
हिज होलीनेस सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांच्या आशीर्वादाने दाऊदी बोहरा समाजाने थंडगार आॕरेंज सरबत वाटपाचा निर्णय घेत समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला.
विशेष म्हणजे ऑरेंज पाणी हे नैसर्गिक क्लिंजर म्हणून काम करते.परिणामी शरीर डिटॉक्स होऊन हायड्रेट राहते. शिवाय त्यात वीटामीन सी आणि अॕन्टी ऑक्सिडंटस् पोषक तत्वे असल्याने शरीरास संजीवनी बहाल करते.ते उन्हाळ्यात अत्यंत लाभदायक असल्याचा शास्त्रोक्त उद्देश डोळ्यापुढे ठेवत सेवाभावाने हजोरो नागरीकांना समाजातील तरुणांनी भर सरबत वाटप केले.
स्वच्छतेची विशेष काळजी..अनेकांचे तोंडुन स्तुती सुमने
यावेळी तरूणांनी हॅण्ड ग्लोज, तोंडाला मास्क घालून विशेष काळजी घेतली असून जनतेने अस्वच्छता करू नये म्हणून सोबत कचरा कुंडीही ठेवून स्वच्छतेची काळजी घेण्यात आली आहे.समाज नेहमीच स्वच्छतेचा पाईक असून जनतेने कार्यक्रम राबवितांना हा गुण घेण्यासारखा असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ,फरजदक राजा, हसन ट्रान्सपोर्टवाला,जुजर जीनवाला, मुफद्दल राजा, अली अजगर अनिस, अली अकबर राजा, शब्बीर अनिस, मुस्तफा राजा, ताहेर ट्रान्सपोर्ट वाला, बुऱ्हाण जीनवाला यांनी मेहनत घेतली.

No comments