adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शासकीय रुग्णालयात बेडची संख्या वाढवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : सुमय्या अली

 शासकीय रुग्णालयात बेडची संख्या वाढवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : सुमय्या अली  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अकोला:- मा...

 शासकीय रुग्णालयात बेडची संख्या वाढवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू : सुमय्या अली 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अकोला:- मागील काही दिवसांपासून शासकीय रुग्णालयात रुग्णांना होत असलेल्या गैरसोयी व त्रासाच्या पार्श्वभूमीवर नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमय्या अली यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांच्या समस्या जाणून घेत प्रशासनाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

रुग्णालयातील परिस्थिती पाहून त्यांनी आरोग्यमंत्री, शासकीय रुग्णालयाचे डीन तसेच अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने पाठपुरावा केला. रुग्णालयात बेडची कमतरता असल्यामुळे एका बेडवर दोन महिला रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विशेषतः गर्भवती महिलांना अशा परिस्थितीत उपचार दिले जात असल्याने त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास शासन व आरोग्य विभाग जबाबदार राहील, असा इशाराही सुमय्या अली यांनी दिला.

रुग्णालयातील बेडची संख्या तातडीने वाढवून रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

No comments