मोठा वाघोदा येथील मेहरबान तडवी ची एसआरपीएफ मध्ये निवड रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मोलमजुरी अथक परिश्रम मेहनत...
मोठा वाघोदा येथील मेहरबान तडवी ची एसआरपीएफ मध्ये निवड
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोलमजुरी अथक परिश्रम मेहनत कष्ट करून जिद्द, चिकाटी, मेहनतीने आणि कष्टाचं मिळालं खरं फळ!
मोठा वाघोदा येथील मेहरबान तडवी ची एसआरपीएफमध्ये निवड ही फक्त नोकरी नाही, तर देशसेवेची जबाबदारी आहेच.पण प्रेरणादायीही आहे एखाद्या मेहनती कामगार मजूर व्यक्तीची सैन्य दलात एसआरपीएफमध्ये निवड होणं ही खरंच अभिमानाची बातमी आहे. अशा बातम्या ऐकूनच प्रेरणा मिळते.
मोठा वाघोदा गावातील केळी कामगार मजूर तसेच पितृक्षत्र हरवलेल्या मेहरबान तडवी या तरुणाने पुणे येथे सतरा हजार विद्यार्थ्यांच्या भरतीमध्ये SRPF मध्ये बाजी मारली व तडवी मिल समाजातील एकमेव त्याचे सिलेक्शन झाले. यांचा परीवार वाघोदा येथे मामा च्या स्थायिक असुन तो पाल येथील रहीवासी स्वर्गीय निजाम रमजान तडवी यांचा मुलगा स्वर्गीय अजित निजाम चा भाऊ तसेच चिनावल रावेर पंचायत समितीच्या माजी सभापती हसीनाताई इकबाल तडवी यांचा जावई आहे. मेहरबान तडवी च्या एस आर पी एफ मध्ये निवडीबद्दल समाज बांधवांनी तसेच आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी सरपंच मुबारक तडवी मित्र परिवार सोबतच गावकऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छारुपी कौतुक केले

No comments