खाकीची कमाल! खुनाचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या कोतवाली अन् मोबाईल सेलसह 'या' ६ शिलेदारांचा विशेष सन्मान..! सचिन मोकळं अहिल्यानगर (संप...
खाकीची कमाल! खुनाचा गुन्हा उघडकीस आणणाऱ्या कोतवाली अन् मोबाईल सेलसह 'या' ६ शिलेदारांचा विशेष सन्मान..!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील खुनाच्या क्लिष्ट आणि आव्हानात्मक गुन्ह्याचा सखोल तपास करून आरोपींना अटक करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार विशाल दळवी,विनोद बोरगे,सुरज कदम,बाळकृष्ण दौंड,रमेश शिंदे दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांना अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.दि.२७ एप्रिल २०२६ रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गु.र.नं. २२२/२०२६, बीएनएस कलम १०३(१), २३८ (३)(५) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करताना मिसिंग व्यक्ती प्रसाद रोहिदास जाधव यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. आरोपींनी वाकोडी शिवारातील उसाच्या शेतात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून करून मृतदेह टाकून दिला होता.या प्रकरणात गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत वरील पोलीस अंमलदार यांनी आरोपींचा शोध घेतला.आरोपी शुभम हरि भोसले (वय २०, रा. वाकोडीफाटा) आणि समाधान उर्फ बाळ्या रामदास सोनवणे (वय ४२, रा. बुरुडगाव) यांना अटक करून गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. या सर्व पोलीस अंमलदारांनी या केलेली कामगिरी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करत,भविष्यातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून पोलीस दलाची प्रतिमा उंचावावी, अशा शुभेच्छा प्रशस्तीपत्रातून देण्यात आल्या.हे प्रशस्तीपत्र जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

No comments