ITSE 2025-26 परीक्षेत सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चहार्डी : चहार्डी...
ITSE 2025-26 परीक्षेत सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चहार्डी : चहार्डी विद्या प्रसारक मंडळ संचलित सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ITSE (Indian Talent Search Examination) 2025-26 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.
राज्य गुणवत्तायादीत (State Special Eligibility Result) शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी मानाचे स्थान पटकावले. त्यामध्ये लावण्या गोपाल पाटील हिने राज्य क्रमांक १ मिळवत २९६ गुण प्राप्त केले. तसेच गायत्री महेश बिऱ्हाडे हिने राज्य क्रमांक २ मिळवत २९४ गुण, राजनंदिनी राहुल भदाणे हिने राज्य क्रमांक २ मिळवत २९४ गुण, तर याचिका ज्ञानेश्वर पाटील हिनेही राज्य क्रमांक २ मिळवत २९४ गुण प्राप्त केले.
याशिवाय जिल्हा गुणवत्तायादीतील ९ पैकी सर्व ९ विद्यार्थी हे सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे असून, ही बाब शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे. तसेच २२ विद्यार्थ्यांनी केंद्रस्तरीय गुणवत्तायादीत स्थान मिळवत शाळेच्या यशात भर घातली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गशिक्षिका श्रीमती अनिता रघुनाथ पाटील यांनी परिश्रमपूर्वक मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे उज्ज्वल यश संपादन केले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश शामराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पराग पाटील, सेक्रेटरी ॲड. प्रकाश आनंदराव पाटील, संस्थेचे सर्व कार्यकारी सदस्य, शालेय समितीचे चेअरमन व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती अनिता रघुनाथ पाटील यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण यशामुळे सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

No comments