adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई..ब्रँडेड लाखो रुपयांचा मोठा मद्यसाठा हस्तगत..!

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई..ब्रँडेड लाखो रुपयांचा मोठा मद्यसाठा हस्तगत..! सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  ​...

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई..ब्रँडेड लाखो रुपयांचा मोठा मद्यसाठा हस्तगत..!


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड) 

​अहिल्यानगर:-  जिल्ह्यात अवैध दारू तस्करांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) ने धडक मोहीम उघडली आहे. अधीक्षक श्री.प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली, रा.ऊ.शु.भरारी पथक (अहिल्यानगर-१ विभाग) यांनी एका खात्रीलायक बातमीच्या आधारे श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे परिसरात सापळा रचून गोवा राज्य निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या विदेशी मद्याच्या साठ्यासह दोन वाहने जप्त केली आहेत.या कारवाईत एकूण ६,८३,९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे,तर दोन आरोपी फरार झाले आहेत.​मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार,दि. ०३/०६/२०२६ रोजी भरारी पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळे-येळपणे रोडलगत असलेल्या हॉटेल लोकसेवा समोर येळपणे परिसरात सापळा लावला होता. संशयास्पद वाटल्यावरून पथकाने एका फोर्ड कंपनीची चारचाकी कार आणि एका दुचाकीला थांबवून त्यांची कसून तपासणी केली.​वाहनांची तपासणी केली असता,त्यात खाकी रंगाचे संशयास्पद बॉक्स आढळून आले.हे बॉक्स उघडले असता,त्यात केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी अधिकृत असलेला आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस पूर्णपणे प्रतिबंधित असलेला नामांकित ब्रँड्सचा विदेशी मद्याचा साठा मिळून आला.पथकाने एकूण १३ बॉक्स जप्त केले आहेत,ज्यामध्ये खालील ब्रँड्सचा समावेश आहे:
​रॉयल चॅलेंज व्हिस्की (Royal Challenge Whisky)
​रॉयल स्टॅग व्हिस्की (Royal Stag Whisky)
​मॅकडॉवेल नंबर १ व्हिस्की (McDowell's No.1 Whisky)
​रोमनोव्ह व्होडका (Romanov Vodka)
​ओल्ड मंक रम (Old Monk Rum),​राज्य उत्पादन शुल्क विभागाने या कारवाईत दारूच्या साठ्यासह तस्करीसाठी वापरण्यात आलेली खालील वाहने जप्त केली आहेत.  ​याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (अ)(ई), ८०, ८१, ८३, ९० आणि १०३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान ०१ आरोपीला अटक करण्यात आली असून, अंधाराचा फायदा घेऊन वाहनांमधील ०२ आरोपी फरार झाले आहेत.फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून,या आंतरराज्य दारू तस्करीत आणखी कोणाचा हात आहे का, याचा अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करत आहेत.

No comments