वेळोदे येथे कृषी केंद्रांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट चोपडा तालुका प्रतिनिधी : मछिंद्र कोळी (संपादक : हेमकांत गायकवाड) वेळोदे येथे ये...
वेळोदे येथे कृषी केंद्रांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट
चोपडा तालुका प्रतिनिधी : मछिंद्र कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
वेळोदे येथे येणाऱ्या खरीप हंगामात रासायनिक खतांचा व कृषी निविष्ठाचा किफायतशीर वापर करा-श्री दिपक साळुंखे ता.कृ.अ.चोपडा*
दिनांक 3 जून 2026 रोजी वेळोदे ता चोपडा येथे तालुका कृषि अधिकारी,मा.श्री दीपक साळुंखे साहेब,मंडळ कृषि अधिकारी, श्री एन डी जाधव, उप कृषि अधिकारी श्री एम वाय महाजन, उप कृषी अधिकारी श्री चेतन साळुंखे यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम 2026 पूर्व तयारी,रासायनिक खतांचा किफायतशीर वापर या विषयी मा श्री दिपक साळुंखे साहेब यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शक केले तसेच बीजप्रक्रिया कशी करावी याबद्दल श्री एन डी जाधव यांनी मार्गदर्शन केले, महाविस्तार AI अँप नोंदणी व वापराबाबत सहाय्यक कृषि अधिकारी श्री राहुल साळुंखे यांनी माहिती दिली,सहाय्यक कृषि अधिकारी श्री विलास मोरे व श्री मुकेश मोरे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे आयोजनासाठी प्रयत्न केले,या कार्यक्रमास वेळोदे येथील प्रगतिशील शेतकरी श्री संजय बोरसे,अरुण पाटील व गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

No comments