adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम व सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम व सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा  भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल ...

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम व सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल :  शहरातील कृष्णतारा नगर येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम व सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप माहेश्वरी यांनी भूषविले, तर मुख्याध्यापिका सौ. शीला तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरण दिनानिमित्त शाळेच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. शीला तायडे यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थितांना वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व, पर्यावरण संरक्षणाची गरज आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित पर्यावरण जपण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. वृक्षारोपण हा केवळ एक उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments