रावेर तालुक्यात अस्मानी संकट; वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान! केळीबागा उध्वस्त.वृक्ष उन्मळले बत्तीही गुल,बळीराजा हतबल मुबारक तडवी रावेर (सं...
रावेर तालुक्यात अस्मानी संकट; वादळी वाऱ्यासह पावसाचे थैमान!
केळीबागा उध्वस्त.वृक्ष उन्मळले बत्तीही गुल,बळीराजा हतबल
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि ४जून रोजी सायंकाळी ६वाजेच्या सुमारास प्रचंड वेगाने आलेल्या वादळात मोठे वाघोदासह चिनावलला कुंभारखेडा,सावखेडा,विवरा निंभोरा परिसरात वादळ,वारा पावसाचा तडाखा बसल्याने केळी पीक भुईसपाट झाली. असून रावेर तालुक्यातील शेतकरी राजाच्या शेतातील कोट्यवधी रुपयांचे पीक नेस्तनाबूत केले आहे आठवडाभरात तिसऱ्यांदा सुल्तानी व अस्मानी आपत्ती ने शेतकरी हवालदिल झाला आहे विवरा कुंभारखेडा भागात गारपीटही झाली आहे. रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक निंभोरा विवरा सावखेडा, कुंभारखेडा, चिनावल, परिसराला गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता वादळी वाऱ्यासह, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. एकाच आठवडयात तीनवेळा वादळी वाऱ्याने थैमान घातले या वादळात ऐन कापणीस आलेली केळी आडवी झाली. या पावसाने सुकी नदीला हलका पूर आला. तर कुंभारखेडा गावात पूरस्थितीसारखे वातावरण होते.
रावेर तालुक्यासह परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सावखेडा,
कुंभारखेडा, गौरखेडा व लोहारा परिसराला अक्षरशः झोडपून काढले. कुंभारखेडा परिसरात बोराच्या आकाराची गारपीट झाली. सावखेडा येथील जिल्हा परिषद शाळेजवळील मोठे लिंबाचे झाड वादळामुळे उन्मळून पडले. यामुळे शाळेच्या शौचालयाचे नुकसान झाले. सावखेडा खुर्द येथे झाडाची मोठी फांदी वीज तारांवर पडल्याने बीजपुरवठाही खंडित झाला होता. वादळाचा वेग एवढा मोठा होता की अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. सावखेडा बुद्रुक, साक्खेडा खुर्द, गौरखेडा व कुंभारखेडा परिसरातील काही घरांवरील पत्रे उडून गेली. निंबोल, रेभोटा, खिर्डी शिवारात देखील केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले. बादळाने ५० पेक्षा जास्त वृक्ष कोसळले. खिर्डी वादळी वाऱ्यामुळे सावखेडा खुर्द येथे झाडाची फांदी वीज तारांवर कोसळली,
कुंभारखेडा गावात पुरासारखे दृश्य पावसामुळे कुंभार खेडेगावातील गल्ल्यांमधून पुरासारखे पाणी वाहत होते. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची
धावपळ उडाली. तर चिनावल, विवरा, उटखेडा, कुंभारखेडा, सावखेडा, वाघोदे शिवारात गारपीट व पावसाचे प्रमाण कमी असले तरी वादळाने काही मिनिटांतच होत्याचे नव्हते केले. या भागातील सर्व केळीबागा भुईसपाट होऊन शेतकरी राजाच्या कोट्यवधी रुपयांची केळी पीक जमीनदोस्त झाली आहे या वादळी वाऱ्याने अंकलेश्वर बुर्हानपुर महामार्गावर सावदा रावेर रस्त्यावर मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडल्याने रात्री उशिरापर्यंत वाहतूक विस्कळित झाली होती वाहनांच्या लांबच्या लांब दुतर्फा लागल्या होत्या विद्युत वाहिनीच्या तारावर वृक्ष व फांद्या पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता महावितरण विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला





No comments