adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उपोषणाचा तिसरा दिवस पेटला! प्रशासन झोपेत आंदोलन भडकले! मागण्या पूर्ण नाही तर आंदोलन उग्र! आझाद मैदान मुंबई येथे उपोषण

 उपोषणाचा तिसरा दिवस पेटला!  प्रशासन झोपेत आंदोलन भडकले!  मागण्या पूर्ण नाही तर आंदोलन उग्र!  आझाद मैदान मुंबई येथे उपोषण मुंबई प्रतिनिधी (स...

 उपोषणाचा तिसरा दिवस पेटला! 

प्रशासन झोपेत आंदोलन भडकले!

 मागण्या पूर्ण नाही तर आंदोलन उग्र! 

आझाद मैदान मुंबई येथे उपोषण



मुंबई प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरोधात पेटलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून उपोषणाच्या तिसऱ्या दिवसही तितक्याच तीव्रतेने सुरू आहे. प्रशासन मात्र या उपोषणाकडे दुर्लक्ष करत असल्याने आंदोलन अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेले हे आमरण उपोषण आता जनआक्रोशाचे केंद्र बनले आहे.

08 जून 2026 पासून अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे बेमुदत उपोषण तिसऱ्या दिवशीही अखंड सुरू आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक या उपोषणात सक्रिय सहभागी झाले असून “एकच मंच – सर्व समस्या” या ध्येयाने हे उपोषण आंदोलन उभे राहिले आहे.

महाराष्ट्रातील अनेक गंभीर तक्रारी प्रशासनाकडे वारंवार देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. “न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार” अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, प्रशासनाने अद्याप उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणतेही ठोस निर्णय न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी वाढत आहे. उपोषणकर्ते म्हणतात की, वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष झाल्यानेच आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला.

या उपोषणाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या मागण्यांमध्ये देवणी तहसील परिसरातील माती चोरी प्रकरणी तहसीलदार दोषी असल्याने कारवाईची मागणी, निलंगा तालुक्यातील शिऊर येथे शासकीय पाझर तलाव बेकायदेशीर बुजवून अतिक्रमण केल्याने कारवाईची मागणी, देवणी तालुक्यात बेकायदेशीर खडी क्रशर, मांजरा नदीतील काळी माती उपसा प्रकरणी दोषी असलेले तहसीलदार व जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी, ओव्हरलोड वाहनाना अभय देणाऱ्या आरटीओ विरुद्ध कारवाईची मागणी, मजूर सोसायटी अंतर्गत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी, निलंगा तालुक्यात अनधिकृत वीटभट्ट्या, जिल्हा परिषद वलांडी येथील मुख्याध्यापकाने रेकॉर्ड गायब केल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी, जिल्हा परिषद लातूर येथील कार्यकारी अभियंता शेलार यांची हकालपट्टी करण्याची मागणी, वलांडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रावर कब्जा करणाऱ्या शेतकऱ्यावर व नियुक्त कर्मचारी उपकेंद्र बंद करून घरी बसून पगार घेणाऱ्यावर कारवाईची मागणी, अहिल्यानगर येथील महाविद्यालयात होत असलेल्या अनियमतेची चौकशी करून कारवाईची मागणी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग जळकोट अंतर्गत वाढवणा येथे होत असलेल्या दुरुस्ती डांबरीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने चौकशीची मागणी, देवणी नगरपंचायत अंतर्गत गाळे दुकान वाटपामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी, परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे रास्त भाव दुकानदाराने राशन वाटप न करता केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी,

प्रत्येक मागणीमागे गंभीर भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचे उदाहरण असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच हे उपोषण केवळ आंदोलन नसून न्यायासाठीचा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी आणि प्रदेशाध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,

“जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही. आवश्यक असल्यास उपोषण आणखी तीव्र करण्यात येईल.”

या उपोषणात विविध जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. या उपोषणा मध्ये संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी, प्रदेशाध्यक्ष नंदकिशोर धोत्रे, नांदेड जिल्ह्यातून माधव मारकवाड, जळगाव जिल्ह्यातून हुसेन खान, परभणी जिल्ह्यातून अजहर शेख, मारुतीराव ढाले, अन्वर खान, रत्नागिरी जिल्ह्यातून सचिन मोरे, बुलढाणा जिल्ह्यातून डॉक्टर गजानन बाजड, जाकीर मिर्झा, सरफराज खान, रायगड जिल्ह्यातून गिरीश भोपी, गुरुनाथ धुमाळ, मल्हारी पाटील, चिंतामण कराळे,

 छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून शेख सलमान, फिरोज खान पठाण, उपाध्यक्ष बद्रोद्दीन, सय्यद अझरोद्दीन, अब्दुल गफार, शेख अनिस, निलेश मस्के मुंबई येथून हकीम सौदागर, रोहिणी पवार, शुभांगी देसाई, चंद्रकला गायकवाड, मोहिनी पाटील, रूपाली शर्मा, अनुसयादेवी लोहार लातूर जिल्ह्यातील नारायण पांढरे, धोंडीबा कोंडामंगले, सय्यद माजिद, तानाजी भंडे, मारुती पांढरे व अनेक पदाधिकारी उपोषणामध्ये सहभागी आहेत 

दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रतिसादामुळे हे उपोषण आंदोलन अधिक व्यापक होत चालले आहे.

सध्या तरी प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, हे उपोषण किती दिवस चालणार आणि प्रशासन कधी जागे होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

No comments