मुक्ताईनगरात आरक्षण बचाव मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर (संपादक : हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर, दि. 8 जून – ऑल...
मुक्ताईनगरात आरक्षण बचाव मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद
तालुका प्रतिनिधी :- राहुल जयकर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर, दि. 8 जून – ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दिपकभाई केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव मोर्चा मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. या मोर्चामध्ये समाजातील विविध घटकांसह कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली.
आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि संविधानिक हक्कांच्या जतनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात उपस्थितांनी एकजूट दाखवत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मोर्चामुळे मुक्ताईनगर परिसरात सामाजिक व राजकीय चर्चांना वेग आला.
यावेळी उपजिल्हाध्यक्ष अजय शेलार, जिल्हा महासचिव आदित्य गाजरे, जिल्हा युवा उपाध्यक्ष संदीप सुरडकर, जिल्हा युवा सचिव सागर बावस्कर, सोशल मीडिया प्रमुख समीर गाढे, रावेर तालुका अध्यक्ष विनोद मोरे, युवा अध्यक्ष जितू इंगळे, उपाध्यक्ष श्रावण भालेराव, यावल तालुका अध्यक्ष सतीश अडकमोल, जामनेर तालुका अध्यक्ष दिलीप बनसोड यांच्यासह मुक्ताईनगर, रावेर, बोदवड व जामनेर तालुक्यातील संपूर्ण पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चादरम्यान आरक्षणावर कुठल्याही प्रकारचा आघात सहन केला जाणार नाही, असा ठाम इशारा देण्यात आला. तसेच संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
"आरक्षण हा समाजाच्या सामाजिक न्यायाचा पाया आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी समाज रस्त्यावर उतरला असून भविष्यातही लढा अधिक व्यापक केला जाईल," असा संदेश मोर्चातून देण्यात आला.

No comments