मोठा वाघोदा ग्रामपंचायत चे साडे ८ लाखांचे वॉटर कुलर बनले शोपीस? कार्यारंभ नोव्हेंबर २०२५ ला मात्र जून अखेरीस ही थेंब ही पिण्यासाठी मिळाला न...
मोठा वाघोदा ग्रामपंचायत चे साडे ८ लाखांचे वॉटर कुलर बनले शोपीस?
कार्यारंभ नोव्हेंबर २०२५ ला मात्र जून अखेरीस ही थेंब ही पिण्यासाठी मिळाला नाही!
रावेर गटविकास अधिकारीकडे शाकीर मलक याची चौकशी ची मागणी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोठा वाघोदा बुद्रुक तालुका रावेर येथील ग्रामपंचायत ने १५वा वित्त आयोगाच्या निधी अंतर्गत मोठा वाघोदा वासियांना उन्हाळ्यात ५रुपयांत २०लीटर शुद्ध फिल्टर पाणी उपलब्ध होणेकामी १५वा वित्त आयोगाच्या निधीतून
8 लाख ३३हजार रुपये म्हणजेच जवळपास साडे आठ लाख रुपये
खर्च करून नागरिकांसाठी शुद्ध पाणी पुरवठा योजना (प्युरिफायर वाटर )आर ओ मशिन बसविण्यासाठी २०२५ च्या नोव्हेंबर महिन्यात आठ लाख तेहतीस हजार रुपये खर्च करण्यात आले मात्र ८ महीन्यांचा कालावधी उलटूनही
कडक उन्हाळा संपला ! आता पावसाळा सुरू झाला तरीही ही ग्रामपंचायत ने उभारलेल्या या दोन ठिकाणच्या आर ओ वाटर कुलर नागरिकांच्या उपयोगात न येता निव्वळ शोपीस ठरले असल्याचे दिसते?अद्यापही ही आर ओ ची शुद्ध फिल्टर पाणी पुरवठा यंत्रणा तहानलेली असल्याचे चित्र अद्यापही बघायला मिळतेय!
या योजनेत १५ वा वित्त आयोगाच्या निधीतून तरतूद असलेली बिले ग्रामपंचायत प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यातच अदा केली गेली असल्याचे समजते? मात्र मोठा वाघोदा वासियांना ५रुपयात २०लिटर शुद्ध पाणी मिळणे अजूनतरी प्रतिक्षेत च असून भर उन्हाळ्यात या प्रस्तावित आर ओ शुद्ध पाण्याचा थेंब ही मोठा वाघोदा वासिय नागरिकांच्या घशात गेलेला नाही! शासनाने उदात्त हेतूने नागरिकांच्या हक्काचे सोयीसुविधा करिता उपलब्ध करून दिलेला निधीच वाया जातो की काय?हा प्रश्न गांवकर्यासह सुज्ञ नागरिकांना भेडसावत आहे.आणि निधी खर्च करुन संबंधित ठेकेदारांना बिले अदा केली गेली आहेत मात्र ह्या शुध्द पाणी पुरवठा आर ओ वाटर कुलर चे पाणी नागरिकांना पिण्यास कधी मिळेल या आर ओ शुद्ध पाणी पुरवठा शुभारंभ होण्यास मुहूर्त कधी सापडणार ? हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे
यासोबतच डसबीन खरेदी, महीला प्रशिक्षण, गावातील पाणी पुरवठा पाईप लाईन वॉटर व्हॉल दुरुस्ती,जि प मराठी शाळा सोलर प्लॅन्ट पॅनल खरेदी, बसस्थानक परिसरातील अंदाजित ९ लाख रुपये खर्चून अपुर्ण राहीलेली गटार बांधकाम, गावात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पेव्हर ब्लॉक खरेदी किमतीत तफावत? कागदोपत्री जास्त मात्र जमीनीवर काम कमी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे? तसेच मागासवर्गीय विकास कामासाठी ४लाख ८०हजारांचा खर्च केला गेला आहे मात्र मागासवर्गीयांचा हा निधी कुठे कोणी व काय कामी खर्च केला? हे न समजणारे न उलगडणारे कोडं आहे! ग्राम निधी व १५वा आयोगाच्या निधीतून खर्च करण्यात आलेल्या लाखों रुपयांची कामे व प्रशिक्षण साहित्य खरेदी बीलांमध्ये तफावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे
प्रतिक्रिया
मोठा वाघोदा बुद्रुक ग्रामपंचायत तर्फे नागरिकांना पिण्यास शुद्ध पाणी उपलब्ध व्हावा म्हणून ग्रामपंचायत ने ८लाख ३३हजार रुपये खर्च केले आहेत सामग्रीचे बिल ठेकेदारांना दिले गेले आहे मात्र ग्रामपंचायत ने खरेदी केलेल्या आर ओ फिल्टर खरेदीतील बिलात तफावत आहे व अव्वाच्या सव्वा बिल काढण्यात आले आहे याबाबत मी चौकशी चा अर्ज गटविकास रावेर यांच्या कार्यालयात दि ६ मे रोजी केलेला आहे आजतागायत चौकशी पूर्ण झालेली नाही तरी याप्रकरणी सखोल व निक्षपक्ष चौकशी होऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी
मलीक शाकीर मलक
सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पुत्र मोठा वाघोदा बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगांव


No comments