adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निंभोरा येथे सर्व शाळांमध्ये प्रवेशउत्सवाचा जल्लोष

 निंभोरा येथे सर्व शाळांमध्ये प्रवेशउत्सवाचा जल्लोष रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक : हेमकांत गायकवाड) नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभा...

 निंभोरा येथे सर्व शाळांमध्ये प्रवेशउत्सवाचा जल्लोष


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 


(संपादक : हेमकांत गायकवाड)


नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त निंभोरा येथील सर्व शाळांमध्ये मंगळवारी प्रवेशउत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, जि. प. शाळा निंभोरा स्टेशन, न्यू इंग्लिश स्कूल विद्यालय, जि. प कन्या शाळा आणि जि.प उर्दू शाळा येथे पहिल्यांदा शाळेत येणाऱ्या चिमुकल्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी येथील सरपंच निर्मलाताई कोळी, राजीव बोरसे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, केंद्रप्रमुख रागिणी लांडगे, मुख्याध्यापक विकास जनबंधू, गोकुळ माळी, सायरा खान, नितीन दोडके, रसूल तडवी, नाझिया शेख,सोमनाथ उघडे, गौतम कुऱ्हे, इतर शाळांचे पदाधिकारी , शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी शाळांच्या प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी रांगोळ्या, फुगे आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय साहित्य, वह्या-पुस्तके आणि खाऊचे वाटप करून त्यांचा पहिला दिवस आनंददायी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


‘पहिले पाऊल’ या उपक्रमांतर्गत पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पायांचे ठसे कागदावर उमटवून ते पालकांना देण्यात आले. या ठशांची आठवण म्हणून जतन करण्याचे आवाहन शिक्षकांनी केले. यावेळी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, गीत, गोष्टी आणि खेळांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला पालक, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या समाधानाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता. या उपक्रमामुळे मुलांचा शाळेविषयीचा ओढा वाढून गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

No comments