adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लोणवडी येथे पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणवडी येथे पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मलकापूर प्रतिनिधी : अमोल बावस्कर  (संपादक : हेमकांत गायकवाड) मलकापूर गावातील बालकांच्य...

लोणवडी येथे पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद



मलकापूर प्रतिनिधी : अमोल बावस्कर 


(संपादक : हेमकांत गायकवाड)

मलकापूर गावातील बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन आयुष्मान आरोग्य मंदिर,लोणवडी येथे करण्यात आले. यावेळी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्यात आले. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत पालकांनी आपल्या चिमुकल्यांना घेऊन मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पोलिओमुक्त भारताच्या उद्दिष्टासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.यावेळी आरोग्य सेविका, आशा सेविका,अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेतले. पालकांनीही आरोग्य विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

No comments