adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित जळगाव जिल्हा,येथे चेअरमन पदी पारोळा येथील भगवान पाटील तर व्हा. चेअरमन पदी अमळनेर येथील पन्नालाल मावळे यांची बिनविरोध निवड.

स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित जळगाव जिल्हा,येथे चेअरमन पदी पारोळा येथील भगवान पाटील तर व्हा. चेअरमन पदी अमळनेर येथील पन...

स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित जळगाव जिल्हा,येथे चेअरमन पदी पारोळा येथील भगवान पाटील तर व्हा. चेअरमन पदी अमळनेर येथील पन्नालाल मावळे यांची बिनविरोध निवड



अमळनेर प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

दिनांक २५ जुन २०२६ रोजी जळगाव येथे आंबेडकर मार्केटमधील फेडरेशनच्या कार्यालयात, स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांचे फेडरेशन मर्यादित जळगाव जिल्हा, फेडरेशनच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार विभागाचे श्री रविंद्र तायडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली, सर्व नवनिर्वाचित संचालकांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन व व्हा. चेअरमन निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र देवाण घेवाण बाबत व निवडणूक बाबत वेळापत्रक ठरवून निवडणूकीच्या अटी शर्ती बाबत संपूर्ण माहिती दिली, त्या वेळी सर्व हजर संचालकांनी निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्वानुमते श्री भगवान गंगाराम पाटील यांना चेअरमन पदासाठी व पन्नालाल जोगीलाल मावळे यांना व्हा. चेअरमन पदासाठी ठरवले, निवडणूक निर्णय अधिकारी श्री. तायडे साहेबांनी दोन्ही नामनिर्देशन पत्र भरून फेडरेशनच्या चेअरमन पदी श्री भगवान पाटील व व्हा चेअरमन पदी श्री पन्नालाल मावळे यांना बिनविरोध घोषीत करून निवडून प्रक्रिया पार पाडली, यावेळी फेडरेशनचे सचिव श्री जगदीश पांडुरंग बोरसे सह नवनिर्वाचित संचालक श्री जयंतलाल वानखेडे,शंकरराव साळुंके, जितेंद्र जाधव,डॉ.निलेश पाटील, हरीश विसावे, गिरीश ब-हाटे ,अरुण जगताप, सौ.ललिता पाटील हजर होते, संस्थेचे संस्थापक मा. चेअरमन श्री युवराज वाघ यांच्या हस्ते नवनियुक्त चेअरमन, व्हा. चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचा सत्कार करण्यात आला फेडरेशनची बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून सचिव श्री. जगदिश बोरसे व श्री. युवराज वाघ यांनी मोलाचे परिश्रम घेतले आभार श्री हरिष विसावे यांनी मानले.

निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्याने लोक संघर्ष मोर्चा च्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांनी चेअरमन, व्हा. चेअरमन सह सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments