adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संघर्षातून उभे राहिलेले समाजसेवेचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व – स्वातीताई देशमुख खर्चे

 संघर्षातून उभे राहिलेले समाजसेवेचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व – स्वातीताई देशमुख खर्चे  समाजसेवा ही केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून सिद्ध कराव...

 संघर्षातून उभे राहिलेले समाजसेवेचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व – स्वातीताई देशमुख खर्चे 


समाजसेवा ही केवळ शब्दांत नव्हे तर कृतीतून सिद्ध करावी लागते. अशाच निःस्वार्थ भावनेने समाजासाठी कार्य करणाऱ्या मलकापूर येथील स्वातीताई देशमुख खर्चे यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्याचा दिवस आहे.स्वातीताई देशमुख खर्चे या माऊली फाऊंडेशन ग्रुपच्या माध्यमातून रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळोवेळी मदत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. एखाद्या रुग्णाला अचानक रक्ताची आवश्यकता भासल्यास त्या स्वतः पुढाकार घेऊन रक्तदाते शोधण्याचे आणि गरजू रुग्णांना योग्य वेळी मदत मिळवून देण्याचे काम सातत्याने करतात. त्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळाले असून अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे.स्वतःच्या आयुष्यात अनेक संघर्षांना सामोरे जात असतानाही स्वातीताईंनी समाजसेवेचा ध्यास सोडलेला नाही. आपल्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत त्या समाजासाठी वेळ देतात. वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर समतोल साधत त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.

बुलडाणा, अकोला आणि जळगाव जिल्ह्यातील रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास स्वातीताई तत्परतेने सहकार्य करतात. दिवस असो किंवा रात्र, गरजूंच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती अनेकांना प्रेरणा देणारी आहे. रक्तदान चळवळ अधिक बळकट करण्यासाठी त्या सातत्याने जनजागृती करत असून समाजातील अनेक युवकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करतात.त्यांचे कार्य हे केवळ सामाजिक उपक्रम नसून मानवतेची सेवा आहे. संकटात सापडलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण निर्माण करणाऱ्या स्वातीताई देशमुख खर्चे यांचे योगदान निश्चितच कौतुकास्पद आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेची अशीच अखंड ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वातीताई देशमुख खर्चे यांचे सामाजिक कार्य अधिकाधिक वृद्धिंगत होवो आणि त्यांच्या हातून अशीच निरपेक्ष समाजसेवा घडत राहो, हीच सदिच्छा. 


अमोल बावस्कार पत्रकार

नेशन महाराष्ट्र विभागीय संपादक 

युवा तालुका प्रमुख प्रहार संघटना मलकापूर

No comments