adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भरदिवसा हातात तलवार घेऊन घातपाताच्या तयारीत फिरणारा सराईत गुन्हेगार गजाआड..तोफखाना पोलिसांची थरारक कारवाई..!

 भरदिवसा हातात तलवार घेऊन घातपाताच्या तयारीत फिरणारा सराईत गुन्हेगार  गजाआड..तोफखाना पोलिसांची थरारक कारवाई..!  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपाद...

 भरदिवसा हातात तलवार घेऊन घातपाताच्या तयारीत फिरणारा सराईत गुन्हेगार  गजाआड..तोफखाना पोलिसांची थरारक कारवाई..! 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​अहिल्यानगर :- शहरात एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली असून,एका मोठ्या घातपाताचा डाव तोफखाना पोलिसांनी अत्यंत शिताफीने उधळून लावला आहे.जुना बोल्हेगाव रोड परिसरात भरदिवसा हातात नग्‍न तलवार घेऊन दहशत माजवण्याच्या आणि घातपात करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दि.१२ जून २०२६ ची.दुपारी साधारण २:३५ वाजताच्या सुमारास तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना एका अत्यंत विश्वासू गुप्त बातमीदाराकडून एक गोपनीय माहिती मिळाली. “जुना बोल्हेगाव रोडवरील नवीन पुलाच्या पुढे,एका लिंबाच्या झाडाखाली अंगात हिरव्या रंगाचा शर्ट आणि डोक्यावर निळ्या रंगाची टोपी घातलेला एक संशयास्पद इसम उभा आहे.त्याच्याकडे धारदार तलवार असून तो काहीतरी मोठा घातपात करण्याच्या तयारीत आहे!” ही माहिती मिळताच पोलिसांच्या गोटात तीव्र हालचाली सुरू झाल्या.​माहिती मिळताच वेळ न गमावता गुन्हे शोध पथकाचे प्रमुख योगेश चाहेर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.पोलिसांनी त्या संशयास्पद जागेभोवती अत्यंत हुशारीने आणि गुप्तपणे सापळा रचला.पोलिसांची चाहूल लागण्यापूर्वीच त्यांनी त्या इसमाला चारही बाजूंनी घेरले आणि जागीच ताब्यात घेतले.​जेव्हा पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि नाव-गाव विचारले,तेव्हा त्याने आपले नाव सुमेध उर्फ डिंग्या किशोर साळवे (वय २१ वर्षे, रा.निलक्रांती चौक,ता.जि. अहिल्यानगर) असे सांगितले.​पोलिसांनी 'डिंग्या'ची अंगझडती घेतली असता, त्याच्या ताब्यातून सुमारे १०००/- रुपये किमतीची,२७ इंच लांबीची लोखंडी धारदार तलवार जप्त करण्यात आली आहे.भरवस्तीत अशा प्रकारे तलवार बाळगून फिरणाऱ्या या आरोपी विरोधात तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४७८/२०२६, तसेच आर्म अ‍ॅक्ट (हत्यार कायदा) कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार थोरवे हे करत आहेत.​ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.बालाजी वैद्य यांच्या नेतृत्वात ​गुन्हे शोध पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर,पोलीस ​अंमलदार अरुण गांगुर्डे,भानुदास खेडकर, अब्दुलकादर इनामदार,सुधीर खाडे,सुरज वाबळे,सुमित गवळी,अविनाश बर्डे,सतिष त्रिभुवन,सुजय हिवाळे, भागवत बांगर,सतिष शिंदे, शाकीर सय्यद,बाळासाहेब भापसे,कपिल गायकवाड आणि म.पो.ना.जिजा खुडे, दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडु,नितीन शिंदे आणि अरुण सांगळे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

No comments