adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय, कमळगाव येथे उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय, कमळगाव येथे उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा चोपडा तालुका प्रतिनिधी : (संपादक : हेमकांत गायकवाड) आंत...

अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय, कमळगाव येथे उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा







चोपडा तालुका प्रतिनिधी :

(संपादक : हेमकांत गायकवाड)

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय, कमळगाव येथे रविवार (दि. 21 जून 2026) रोजी सकाळी 7 वाजता योग दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये योगाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.सी.पाचपोळ एस.एस.जाधव,एन.पी.पाटील,आर.एम.पाटील,अर्जुन कोळी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री पाचपोळ यांनी प्रास्ताविकातून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर नितीन पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाची पार्श्वभूमी, योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी होणारे फायदे तसेच निरोगी जीवनशैली आणि व्यक्तिमत्त्व विकासामध्ये योगाचे असलेले योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी नितीन पाटील यांनी विविध योगासने प्रत्यक्ष करून दाखवत विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडूनही त्यांचा सराव करून घेतला. वज्रासन, वृक्षासन, ताडासन, पर्वतासन, भ्रामरी, अनुलोम-विलोम, शवासन यांसह विविध योगप्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

तसेच अर्जुन कोळी यांनी योगाचे महत्त्व विशद करणारे आकर्षक फलकलेखन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.

योगामुळे निरोगी शरीर,शांत मन आणि सुदृढ समाज घडतो, हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.







No comments