adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव विद्यालयात प्रवेश उत्सव सोहळा साजरा...

अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव विद्यालयात प्रवेश उत्सव सोहळा साजरा... चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) श्री योगेश्वर श...

अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव विद्यालयात प्रवेश उत्सव सोहळा साजरा...




चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

श्री योगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ कमळगाव संचलित अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय कमळगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात गावात प्रभातफेरी काढुन शाळा सुरू झाल्याची जनजागृती करण्यात आली. 

इयत्ता 5वी व सर्व वर्गातील नविन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे व सर्व विद्यार्थ्यांचे शालेय पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री पंडित आधार न्हायदे तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री संजय मधुकर न्हायदे , पालक वर्ग तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी मुलांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस एस जाधव सर यांनी केले तसेच आभार श्री अर्जुन कोळी यांनी मानले. विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालेय पोषण आहारासोबत गोड मिष्ठान्न देण्यात आले. नवीन वर्षाच्या शुभारंभ प्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षक पालक सर्व आनंदी होते

No comments