adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नाम. रक्षाताई खडसे यांची घनशाम चौधरी यांचेकडे सांत्वनपर भेट

नाम. रक्षाताई खडसे यांची घनशाम चौधरी यांचेकडे सांत्वनपर भेट चोपडा प्रतिनिधी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा - केंद्रीय मंत्री नाम रक्षाताई...

नाम. रक्षाताई खडसे यांची घनशाम चौधरी यांचेकडे सांत्वनपर भेट


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

चोपडा - केंद्रीय मंत्री नाम रक्षाताई खडसे यांनी 15 जून रोजी चोपडा मल्हारपुरा भागातील रहिवासी घनशाम गणपत चौधरी यांचे घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. घनशाम चौधरी यांचा एकुलता एक मुलगा दुबई येथे नोकरीला होता. 31 मे रोजी  त्याचे निधन झाल्याची बातमी मिळाली. सदरच्या घटनेचे वृत्त रक्षाताई खडसे यांना कळविण्यात आली होती.नामदार रक्षाताईंनी योग्य ती कार्यवाही केली. चौधरी कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी रक्षाताई खडसे चौधरी कुटुंबांना भेटल्या.परिवारातील सर्व सदस्यांना धीर देत पुढील कामात मदत करत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक गजेंद्र जयस्वाल माजी नगरसेवक सुनील चौधरी चोपडा तेली समाजाचे अध्यक्ष के डी चौधरी आणि चौधरी परिवारातले सदस्य उपस्थित होते. राजेंद्र गणपत चौधरी यांनी रक्षा त्यांचे आभार मानले.

No comments