निमगव्हान ग्रामपंचायत निवडणूक २०२६ साठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर वार्ताहार निमगव्हान : अविनाश बाविस्कर (संपादक : हेमकांत गायकवाड) निमगव...
निमगव्हान ग्रामपंचायत निवडणूक २०२६ साठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर
वार्ताहार निमगव्हान : अविनाश बाविस्कर
(संपादक : हेमकांत गायकवाड)
निमगव्हान ग्रामपंचायत निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आरक्षण सोडत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. सदर आरक्षण सोडत पारदर्शक पद्धतीने पार पडली असून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी विविध प्रवर्गांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार वार्ड क्रमांक १ मध्ये एक जागा अनुसूचित जमाती (एस.टी.), एक जागा अनुसूचित जाती महिला (एस.सी. महिला) तर एक जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
वार्ड क्रमांक २ मध्ये एक जागा अनुसूचित जमाती, एक जागा अनुसूचित जमाती महिला तर एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आली आहे.
तसेच वार्ड क्रमांक ३ मध्ये एक जागा अनुसूचित जमाती महिला, एक जागा सर्वसाधारण महिला आणि एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमास ग्राम महसूल अधिकारी तिलेश पवार, कृषी प्राधिकारी महेंद्र महाजन, निमगव्हानचे सरपंच दिनेश सपकाळे, सदस्य धनराज बाविस्कर, धनराज पाटील, देवानंद पाटील, संजय बिऱ्हाडे, दिलीप पाटील, कांतीलाल पाटील, ग्रामविकास अधिकारी राजेश सोनार, पोलीस पाटील पवन भिल्ल, ग्रामपंचायत शिपाई शांताराम बाविस्कर यांच्यासह हर्षल पाटील, मच्छिंद्र पाटील, सोनू पाटील, राहुल अहिरे, वासुदेव बाविस्कर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये हालचालींना वेग आला असून गावातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने या आरक्षण सोडतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

No comments