adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये निपुण भारत अभियाना अंतर्गत आज आढावा बैठक

 जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये निपुण भारत अभियाना अंतर्गत आज आढावा बैठक  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक : हेमकांत गायकवाड )  जे टी महाजन...

 जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये निपुण भारत अभियाना अंतर्गत आज आढावा बैठक 

इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

 जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज फैजपूर येथे यावल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांची निपुण भारत अभियान अंतर्गत आढावा बैठक दिनांक शुक्रवार १२ जून रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

    या सभेला जळगाव सीईओ मॅडम करिष्मा नायर, तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन, जळगाव डाएट चे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, पं.स.यावल चे गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.

         सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे. कुणाची ही रजा वरिष्ठांच्या परवानगी शिवाय मंजूर होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येकाने येताना आपल्या वर्गाशी संबंधित निपुणचे स्तरनिहाय्य रेकार्ड सोबत आणावे. सर्वांचे उपस्थिती आवश्यक आहे. गैरहजर राहिल्यास शिक्षक आणि मुख्याध्यापक वैयक्तिक जबाबदार असतील. प्रत्येकाची सकाळी आणि मीटिंग संपल्यानंतर अशी दोन वेळा हजेरी घेतली जाणार आहे. 

सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे यावल पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

No comments