adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बेघर व निराधारांच्या सेवाकार्यासाठी नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर

बेघर व निराधारांच्या सेवाकार्यासाठी नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर चोपडा प्रतिनिधी...

बेघर व निराधारांच्या सेवाकार्यासाठी नरेंद्र पाटील यांना “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” जाहीर


चोपडा प्रतिनिधी

(संपादक : हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच अपनाही घर प्रतिष्ठान संचलित मानव सेवा तीर्थ, चोपडाचे अध्यक्ष नरेंद्र रावण पाटील यांची “महानायक श्री. वसंतरावजी नाईक राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२५” साठी निवड करण्यात आली आहे. बेघर, निराधार व गरजू व्यक्तींसाठी त्यांनी केलेल्या निःस्वार्थ मानवसेवेची दखल घेत हा राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे.


हा पुरस्कार महानायक श्री. वसंतराव नाईक विचार मंच, देवणी (जि. लातूर) आणि एल.बी.एस. मिशन, निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येत आहे. आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, नरेंद्र पाटील यांनी समाजातील उपेक्षित, बेघर व निराधार घटकांच्या सेवेसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.


पुरस्कार वितरण सोहळा १ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता, माने फंक्शन हॉल, बँक कॉलनी रोड, निलंगा, जि. लातूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी नरेंद्र रावण पाटील यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


नरेंद्र पाटील यांनी अनेक वर्षांपासून बेघर, निराधार व गरजू व्यक्तींना निवारा, अन्न व आधार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली गेल्याने चोपडा तालुका तसेच जळगाव जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments