मागण्या मान्य झाल्याने नगर पालिका विरुद्ध समाजवादी पार्टीचे उपोषण चौथ्या दिवशी तात्पुरते स्थगित आश्वासनांची पूर्तता न झाल्यास यापेक्षाही उग्...
मागण्या मान्य झाल्याने नगर पालिका विरुद्ध समाजवादी पार्टीचे उपोषण चौथ्या दिवशी तात्पुरते स्थगित
आश्वासनांची पूर्तता न झाल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन छेडणार – जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार
उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची नगराध्यक्ष करण ससाणे यांनी घेतली दखल; तात्काळ कार्यवाहीचे प्रशासनाला आदेश
श्रीरामपूर प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
येथील वॉर्ड क्रमांक २ मधील नागरी समस्यांबाबत न्याय मिळावा या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आमरण उपोषण नगर पालिका प्रशासनाने मागण्यांची दखल घेत लेखी आश्वासन दिल्यानंतर चौथ्या दिवशी तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले.
वॉर्ड क्र. २ मधील एका शाळा प्रशासनाने परिसरातील अस्तित्वात असलेले गटार बंद केल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या संदर्भात अनेक वेळा नगर पालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्याकडे धाव घेतली होती.
नागरिकांच्या समस्यांची गंभीर दखल घेत श्री. जमादार यांनी नगर पालिका प्रशासनाला निवेदन सादर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. तसेच योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने त्यांनी नागरिकांसह नगर पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले.
उपोषणाचा चौथा दिवस सुरू असताना आंदोलन अधिक तीव्र होत गेले. समाजवादी पार्टीकडून घंटानाद आंदोलन, गेटबंद आंदोलन तसेच रस्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आणि उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले.
नगराध्यक्ष करण ससाणे यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर श्री. जमादार यांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली.
यावेळी बोलताना जोएफ जमादार म्हणाले की, “नगर पालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची वेळेत पूर्तता केली नाही तर समाजवादी पार्टी यापेक्षाही अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल. नागरिकांच्या प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”
यावेळी नगराध्यक्ष करण ससाणे, उपमुख्याधिकारी तापकिरे, रईस जहागीरदार, मुन्ना पठाण, अहमद जहागीरदार,साजिद मिर्जा,
सलिम शेख ( एस.एस.) यांचेसह मुबाश्शिर पठाण, अरबाज कुरेशी, अतीक पठाण, मकसूद मिर्झा, साद पठाण, उमेर जमादार, सादिक शेख, युसूफ मुसानी, अन्वर तांबोळी, आदिल तांबोळी, बाबू शेख, अय्युब शेख, इरफान तांबोळी, समीर शेख, फिरोज तांबोळी, तन्वीर तांबोळी, शाहबाज तांबोळी, सुभान शेख, रिझवाना तांबोळी, अकील सय्यद, तबरेज पटेल, हमीद शेख, मुख्तार शेख, सलीम तांबोळी, सलमान काझी, इस्माईल तांबोळी, राशिद जमादार, गुफरान शेख, रशीद तांबोळी, इमरान शेख, साद तांबोळी, सुलेमान शेख, झकी पटेल, मुश्ताक शेख यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments