adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपुरात एम पी जे शाखेतर्फे मतदान कार्ड एस आर नाव नोंदणी जनजागृती अभियान

 फैजपुरात एम पी जे शाखेतर्फे मतदान कार्ड एस आर नाव नोंदणी जनजागृती अभियान  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथे दि. 12 जून ...

 फैजपुरात एम पी जे शाखेतर्फे मतदान कार्ड एस आर नाव नोंदणी जनजागृती अभियान 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथे दि. 12 जून रोजी मोमेंट फॉर पीस अँड जस्टिस वेलफेअर महाराष्ट्र शाखा (MPJ) फैजपूर यांच्या वतीने मतदान कार्ड (Voter ID) SR.संदर्भात जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानात नागरिकांना मतदान कार्डाचे महत्त्व, मतदार यादीत नाव SR.नोंदणी, दुरुस्ती व अद्ययावत माहिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात एमपीजे फैजपूर शहराध्यक्ष रहिमदिन, उपाध्यक्ष बी. डी. महाले सर, BLO पी. के. चौधरी, कमलाकर कोष्टी सर तसेच एमपीजेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी इस्लामपुरा, तहानगर आणि झोपडपट्टी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदान प्रक्रियेविषयी माहिती घेतली. उपस्थित मान्यवरांनी लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदान कार्ड काढून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमपीजेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून अशा जनजागृती अभियानांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

No comments