adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांचा निकाल; चोपडा शहर पोलिसांच्या तपासाची न्यायालयाकडून दखल

 अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांचा न...

 अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांचा निकाल; चोपडा शहर पोलिसांच्या तपासाची न्यायालयाकडून दखल 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अल्पवयीन मुलीवरील विनयभंग व अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपीस जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश,अमळनेर सी. व्ही. पाटील यांनी ५ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीस सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. प्राप्त माहितीनुसार, चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८५/२०२४ व विशेष प्रकरण क्रमांक ५०/२०२४ मध्ये न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. २१ ऑगस्ट २०२४ रोजी १० वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या विनयभंग व अत्याचाराच्या घटनेप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे सिद्ध मानले. त्यानुसार भारतीय न्याय संहिता व पॉक्सो कायद्यातील संबंधित कलमांखाली आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.

या प्रकरणाचा तपास चोपडा शहर पोलीस ठाण्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केला. तपासादरम्यान पुरावे संकलित करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. तसेच सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्त्यांनी प्रभावी युक्तिवाद करून खटल्याची बाजू भक्कमपणे मांडली. या निकालामुळे अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत कठोर संदेश गेला असून अशा गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तसेच बालकांच्या सुरक्षिततेबाबत समाजाचा विश्वास अधिक दृढ झाल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.



No comments