मातंग समाजाच्या सार्वजनिक चावडीवरील अतिक्रमण प्रकरणाची उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी घेतली तात्काळ दखल अण्णाभाऊ साठेनगर, नान्नज, प्रत...
मातंग समाजाच्या सार्वजनिक चावडीवरील अतिक्रमण प्रकरणाची उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी घेतली तात्काळ दखल
अण्णाभाऊ साठेनगर, नान्नज, प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अण्णाभाऊ साठेनगर, नान्नज, ता. जामखेड, येथील मातंग समाजासाठी राखीव असलेल्या सार्वजनिक चावडीवरील कथित बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनाची उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी, कर्जत विभाग श्री. नितीन पाटील यांनी तात्काळ दखल घेतली आहे. सदर प्रकरणाच्या अनुषंगाने तहसीलदार जामखेड, गट विकास अधिकारी पंचायत समिती जामखेड, उप अधीक्षक भूमी अभिलेख जामखेड तसेच पोलीस निरीक्षक, जामखेड यांना प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सदर जागा ही मातंग समाजासाठी राखीव सार्वजनिक चावडी असल्याने हा विषय सामाजिक व सार्वजनिक हिताचा असून, संबंधित विभागांनी समन्वय साधून मोजणी, चौकशी व आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही तातडीने करणे अपेक्षित आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशानंतर संबंधित प्रशासन त्यांच्या आदेशाची तत्परतेने अंमलबजावणी करून आवश्यक कार्यवाही करते का, याकडे अण्णाभाऊ साठेनगर येथील नागरिकांचे लक्ष लागले असून, या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
— महादेव अरुण साठे
RTI कार्यकर्ते

No comments