श्रीसाईबाबांच्या प्रसादालयात शिवीगाळ! गुन्हा दाखल! सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श...
श्रीसाईबाबांच्या प्रसादालयात शिवीगाळ! गुन्हा दाखल!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीतील श्रीसाईबाबा संस्थानच्या प्रसादालयात चपाती उशिरा दिल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने कर्मचाऱ्यांशी वाद घालत शिवीगाळ, आरडाओरडा आणि धमकावल्याची घटना २४ जून रोजी दुपारी घडली. या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीसाईबाबा संस्थानच्या प्रसादालयात कार्यरत असलेले जगन्नाथ सिताराम मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भरत मोरे (रा. कोपरगाव) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, २२१, ३५१(२), ३५२, ३५६(२), २९२, २९६ आणि २२४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, भरत मोरे हा प्रसादालयात जेवण करत असताना अचानक मोठ्याने ओरडू लागला. "मला चपाती उशिरा का दिली?" असा जाब विचारत त्याने कर्मचाऱ्यांविषयी आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्दांचा वापर केला. तसेच प्रसादालयातील कर्मचारी मदन मोहन सिंग यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यावेळी आरोपीने हिंदी भाषिकांना काम करून देणार नसल्याचे वक्तव्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच मोबाईलद्वारे घटनेचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करत श्रीसाईबाबा संस्थानची बदनामी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दातीर करीत आहेत

No comments