जन्मभूमीने केलेला सत्कार हा माझा सर्वोच्च बहुमान -राजू बाविस्कर राजू बाविस्कर यांचा सत्कार करताना मित्रपरिवार विश्राम तेले चौगाव (संपादक -...
जन्मभूमीने केलेला सत्कार हा माझा सर्वोच्च बहुमान -राजू बाविस्कर 
राजू बाविस्कर यांचा सत्कार करताना मित्रपरिवार
विश्राम तेले चौगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लासुर ता चोपडा, मी ज्या गावात जन्मलो ज्या मातीत वाढलो तेथील माझ्या जन्मभूमीतील सन्माननीय मित्रपरिवाराने जो माझा सत्कार केला हा माझ्या जीवनातील मिळालेला सर्वोच्च बहुमान आहे असे मत " काळया निळ्या रेषा"या आत्मचरित्राचे लेखक व चित्रकार राजू बाविस्कर यांनी आपल्या सत्कारस उत्तर देताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राजू बाविस्कर यांना दिल्ली येथे साहित्य अकादमी तर्फे काळया निळ्या रेषा या त्यांच्या आत्मचरित्रास साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गावातील विविध संस्थांनी व मित्र परिवाराने राजू बाविस्कर यांच्या सहपत्नीक सत्कार केला हा कार्यक्रम श्री नाटेश्वर मंदिर लासुर येथे रविवारी सकाळी 11 वाजता पार पडला . कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल हिम्मतराव पाटील होते .प्रमुख अतिथी म्हणून साहित्यिक सुभाष अहिरे, अशोक कोतवाल, एम के भामरे, सरपंच नर्मदाबाई भिल, माळी समाजाची राज्याध्यक्ष प्रा.ए के गंभीर ,प्राचार्य राजेंद्र महाजन रा शा पाटील, प्रल्हाद सोनार ,आर एस पाटील उपस्थित होते. राजू बाविस्कर यांच्या " काळया निळ्या रेषा " या आत्मचरित्रातील व्यक्तिरेखा, गावातील बोलक्या गल्ल्या, ईदगाह मैदान , सोसलेली आर्थिक स्थिती ,अर्धवट शिक्षणातून होणार पुनरागमन हा लेखाजोखा वक्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला .अहिराणी कवी सुभाष अहिरे यांनी राजू बाविस्कर यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात अहिराणी भाषेच्या कवितेतून कार्यक्रमात रंग चढविला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिकनराव पाटील प्रा.युवराज बेडेकर, विलास पाटील, रमेश पवार, भागवत वाघ, कैलास महाजन, देविदास मोरे, बापू चौधरी, योगेंद्र अहिरे यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवीलाल बाविस्कर यांनी तर आभार हरेंद्र बिडकर यांनी मांडले
No comments