adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जागतिक रक्तदान दिनानिमित्त वाशिम येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न...

जागतिक रक्तदान दिनानिमित्त वाशिम येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न... वाशिम  प्रतिनिधी दि. १४ जून २०२६ (संपादक : हेमकांत गायकवाड) जागतिक रक...

जागतिक रक्तदान दिनानिमित्त वाशिम येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न...



वाशिम  प्रतिनिधी दि. १४ जून २०२६

(संपादक : हेमकांत गायकवाड)

जागतिक रक्तदान दिनानिमित्त वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिराला युवकांसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जपली.

या प्रसंगी मानससेवा संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर सर, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर मुंडे सर, लॅब टेक्निशियन सचिन दंडे सर ,बिरसा मुंडा क्रांती दलचे विजय करवते, अक्षय इंगोले, प्रवीण कांबळे आणि रामदास कालापाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरादरम्यान रक्तदात्यांचा सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करत, "रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते," असा प्रेरणादायी संदेश दिला. तसेच प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजसेवेत आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदीश मानवतकर ग्रुपने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदाते, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही अशा जनहिताच्या उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

No comments