सौ तु .ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर मुक्ताईनगर शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सौ त...
सौ तु .ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर मुक्ताईनगर शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सौ तु .ल.कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर मुक्ताईनगर शाळेत शाळा प्रवेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नवीन प्रवेश असलेल्या इयत्ता १ ली च्या विद्यार्थ्यांना छान सजवलेल्या ट्रॅक्टर मधून शाळेत आणण्यात आले मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा विलास भारंबे यांनी विद्यार्थ्यांना तिलक लावून चॉकलेट दिले सर्व शिक्षक वृंदाने नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन केले. शाळेच्या परिसरात रंगीबेरंगी फुगे, रांगोळ्या काढल्या होत्या विशेष म्हणजे विद्यार्थी व पालकांसाठी सेल्फी पॉईंट सुद्धा तयार करण्यात आला होता पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले मध्यान भोजनात गोडवा म्हणून जिलेबी वाटण्यात आली
कार्यक्रमाला पालकांनी सुद्धा हजेरी लावली होती विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दलची आवड वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन ॲड सौ. रोहिणी ताई खडसे खेवलकर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री नारायण चौधरी, सेक्रेटरी श्री सी. एस. चौधरी, स्कूल कमिटी अध्यक्ष श्री पुरुषोत्तम भाऊ निवृत्ती महाजन यांनी कौतुक केले.


No comments