कोळन्हावीतील २४ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; यावल पोलिसांत गुन्हा दाखल भरत कोळी यावल संपादक : हेमकांत गायकवाड यावल : तालु...
भरत कोळी यावल
संपादक : हेमकांत गायकवाड
यावल : तालुक्यातील कोळन्हावी येथील २४ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १८) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन रवींद्र कोळी (वय २४, रा. कोळन्हावी) हा कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यावरील पाटाच्या चारीजवळ लघुशंकेसाठी उभा असताना अज्ञात वाहनाने त्याला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर पवन कोळी याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी केले. या घटनेप्रकरणी उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106(1), 281, 125(अ)(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेबाबत परिसरात विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार पुढील तपास करीत आहेत.

No comments