अहिल्यानगर..धक्कादायक! खाकी वर्दी पुन्हा डागाळली; 'या' पोलीस ठाण्यातील तब्बल ३ पोलीस कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडले! सचिन मोक...
अहिल्यानगर..धक्कादायक! खाकी वर्दी पुन्हा डागाळली; 'या' पोलीस ठाण्यातील तब्बल ३ पोलीस कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडले!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:- पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे.कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस खात्यातील तीन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दादा म्हस्के,नितीन गाडगे, राजेश जाधव या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका कामासाठी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) कडे या संदर्भात रीतसर तक्रार नोंदवली.तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या परिसरात अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेतले.एकाच वेळी एकाच पोलीस ठाण्यातील तीन-तीन कर्मचारी लाचखोरीच्या जाळ्यात अडकल्याने अहमदनगर जिल्हा पोलीस दलासह संपूर्ण राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. "रक्षकच बनले भक्षक" अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून उमटत आहे.या तिन्ही आरोपी कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, एसीबीचे पथक पुढील तपास करत आहे.
या मोठ्या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments