चोपडा शहर पोलीस व नगरपालिका संयुक्त कारवाई, वाहतुकीस अडथळा ठरणारी बांधकामे हटवली, चोपडा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम, चोपडा प्रतिनिधी रविंद्र क...
चोपडा शहर पोलीस व नगरपालिका संयुक्त कारवाई,
वाहतुकीस अडथळा ठरणारी बांधकामे हटवली,
चोपडा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम,
चोपडा प्रतिनिधी रविंद्र कोळी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून चोपडा शहर पोलीस प्रशासनाने मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अनधिकृत बांधकामे,टपऱ्या,ओटे तसेच इतर अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने कायदेशीर प्रक्रियेनुसार हटविण्यात आली.
शहरातील प्रमुख रस्ते,चौक आणि गर्दीच्या भागांमध्ये ही कारवाई करण्यात आली. अतिक्रमणामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे प्रशासनाने पूर्वसूचना देऊन ही मोहीम हाती घेतली.
कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी स्वतःशहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले आणि दोन पोलीस उपनिरीक्षक व एक आरसीबी जवान हे बंदोबस्ता करिता उपस्थित होते. पोलिसांच्या मदतीने अतिक्रमित जागा मोकळी करण्यात आली. या मोहिमेमुळे शहरातील रस्ते अधिक प्रशस्त झाले असून वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला आहे.
यापुढेही सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.



No comments