युवाभारत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा दणदणीत यशसोहळा प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनगर : ग्रामीण भागातील वि...
युवाभारत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा दणदणीत यशसोहळा
प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशाची दिशा देणाऱ्या युवाभारत स्पर्धा परीक्षा अकॅडमीने यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. सन २०२६ मध्ये अकॅडमीतील तब्बल १३ विद्यार्थ्यांची विविध सरकारी सेवांमध्ये निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ५ विद्यार्थ्यांची अग्निवीर (आर्मी), २ विद्यार्थ्यांची पुणे पोलीस, १ विद्यार्थ्याची मुंबई पोलीस, १ विद्यार्थ्याची आसाम रायफल, १ विद्यार्थ्याची बीएसएफ तसेच ३ विद्यार्थ्यांची महावितरण विद्युत सहाय्यक पदासाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विशाल गोसावी (नाडगाव), रितेश पाटील (शेमळदे), चिराग पाटील (उचंदा), आर्यन भोई (मेळसांगवे), तुषार कुंभार (मेळसांगवे), पवन पाचपोळ (नाडगाव), क्रिष्णा पारधी (वडगाव टाकळी), अक्षय सोनवणे (निमखेड), अनुराधा तेली (पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा), राहुल धंडारे (निमखेडी), पुनम कुंभार (मेंढोळदे), ममता सुतार (मेळसांगवे) आणि ऋतुजा धुरंधर (कुर्हा) यांचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी संत मुक्ताई कॉलेजच्या ज्ञानेश्वर सभागृहात भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील सर होते. यावेळी अकॅडमीचे संचालक प्रा. संतोष सोनार सर, प्रा. डॉ. शेवाळे सर, मा. रामू मेढे सर, मा. जय निकम सर, प्रा. कवी व लेखक अ. फ. भालेराव सर, प्रा. अश्विनी सोनार मॅडम, ब्रिलिअंट लायब्ररीचे संचालक ओम तळेले तसेच प्रा. जाधव सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मोठे यश संपादन करू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अकॅडमीचे संचालक प्रा. संतोष सोनार सर यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या अथक परिश्रमांना, पालकांच्या सहकार्याला आणि अकॅडमीच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला दिले. या सत्कार समारंभास विद्यार्थी, पालकवर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशाची परंपरा कायम राखत युवाभारत स्पर्धा परीक्षा अकॅडमीने पुन्हा एकदा विविध सरकारी सेवांमध्ये निवडीचा नवा विक्रम प्रस्थापित करत मुक्ताईनगर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा ठसा उमटविला आहे.

No comments