जे.ई. स्कूल मुक्ताईनगर येथे उत्साहात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मुक्ताईनग...
जे.ई. स्कूल मुक्ताईनगर येथे उत्साहात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन
प्रा. सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर, ता. २१ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जे.ई. स्कूल, मुक्ताईनगर येथे योग व प्राणायाम कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करत विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्य व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक के. आर. कवळे, व्ही. डी. बऱ्हाटे, योगशिक्षक एस. बी. वंजारी, क्रीडाशिक्षक एस. एम. वाढे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाशिक्षक एस. एम. वाढे यांनी केले. त्यानंतर योगशिक्षक एस. बी. वंजारी यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात योग, प्राणायाम आणि आसनांनी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एस. एम. वाढे, एस. जे. मोरे, एम. आर. चौधरी, एस. एन. भोळे तसेच सर्व शिपाई कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमासाठी फलक लेखनाचे काम कलाशिक्षक एम. आर. सुरवाडे यांनी केले. शेवटी एस. बी. वंजारी यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
"योग ही निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा," असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

No comments