दुःखद निधन वार्ता घाडवेल गावावर दुःखाचा डोंगर घाडवेल, ता. चोपडा, जि. जळगाव येथील रहिवासी कै. मुकेश योगराज चौधरी (वय ४२ वर्षे) यांचे अल्पशा ...
दुःखद निधन वार्ता
घाडवेल गावावर दुःखाचा डोंगर
घाडवेल, ता. चोपडा, जि. जळगाव येथील रहिवासी कै. मुकेश योगराज चौधरी (वय ४२ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने गुरुवार दिनांक १८ जून २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने घाडवेल परिसरात हळहळ व्यक्त होत असून चौधरी-गोहिल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि. १८ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता घाडवेल येथून निघाली.
त्यांच्या पश्चात वडील योगराज मनीलाल चौधरी, काका रमल मनीलाल चौधरी, दत्तू बाबुराव चौधरी, साहेबराव बाबुराव चौधरी, सुरेश बाबुराव चौधरी, भाऊ यज्ञेश्वर योगराज चौधरी, विजय रमण चौधरी, रवींद्र रमण चौधरी, हेमंत रावण चौधरी, सुनील रावण चौधरी, चेतन संतोष चौधरी तसेच पुत्र सुमित मुकेश चौधरी व तन्मय मुकेश चौधरी असा मोठा परिवार आहे.
समस्त चौधरी-गोहिल परिवार व घाडवेल ग्रामस्थ मंडळींनी कै. मुकेश योगराज चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
"ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो."

No comments