adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सौ. कुसुमताई इंग्लिश मेडियम स्कूल, अंतुर्ली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सौ. कुसुमताई इंग्लिश मेडियम स्कूल, अंतुर्ली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा   प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गाय...

सौ. कुसुमताई इंग्लिश मेडियम स्कूल, अंतुर्ली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा 


 प्रा सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अंतुर्ली : तापी परिसर बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था संचलित सौ. कुसुमताई इंग्लिश मेडियम स्कूल, अंतुर्ली येथे २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. भागवत महाजन, उपाध्यक्ष श्री. शरदजी महाजन, सचिव श्री. पी. आर. पाटील, संचालक श्री. टिके पाटील, श्री. भाऊराव महाजन, श्री. मोती शेख, श्रीमती कुसुमताई महाजन, सौ. वैशालीताई दिनेश पाटील, श्री. श्रीराम महाजन, श्री. जगन्नाथ पाटील, श्री. विशाल पाटील, श्री. भास्कर महाजन, श्री. रामदास सोनवणे तसेच इतर संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्रशासक श्री. मासुळे सर यांनी केले. तर प्राचार्य सौ. प्रियंका पवार यांनी कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन करून तो यशस्वीरीत्या पार पाडला.

यावेळी प्राचार्य सौ. प्रियंका पवार यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व समजावून सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी जीवनशैली विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमास उपस्थित पालकांनी योग दिन उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत नियमित योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

योगाच्या माध्यमातून निरोगी समाज घडविण्याचा संदेश देत सौ. कुसुमताई इंग्लिश मेडियम स्कूलचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.

No comments