सार्वजनिक विद्यालय अडावद येथे योग दिन उत्साहात साजरा, अडावद प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) येथील सार्वजनिक विद्यालय अडावद येथे आज ...
सार्वजनिक विद्यालय अडावद येथे योग दिन उत्साहात साजरा,
अडावद प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
येथील सार्वजनिक विद्यालय अडावद येथे आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम योग दिनानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक ए जे कदम यांनी विद्यार्थ्यांना योगाचे होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे यांच्या विषयी माहिती दिली. योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर उपशिक्षक सचिन पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून अनेक योगक्रिया करवून घेतल्या. विद्यार्थ्यांसोबतच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी देखील योग दिनानिमित्त योगक्रियेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
योग दिनाचे अवचित्य साधून विद्यालयास चोपडा तालुका भाजपाचे जिल्हा चिटणीस हनुमंत महाजन, चोपडा पूर्व भाजपा अध्यक्ष पिंटू पावरा, अडावद ग्रामपंचायत व भाजपा तालुका चिटणीस सदस्य संदीप महाजन, भाजपा चोपडा तालुका खजिनदार भूपेंद्र पंचोली हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी देखील योगक्रियेत सहभाग नोंदवला.
योग क्रिया कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .
अडावद ता चोपडा येथील सार्वजनिक विद्यालयात योगा करतांना विद्यार्थी व मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर

No comments