adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गटारीचे सांडपाणी रस्त्यावर! रस्त्यावर तलाव सदृश नागरिकांचा कसरती प्रवास. रमजीपुर रस्त्यावरील प्रकार ! रावेर सा.बा.विभागाने लक्ष देण्याची मागणी

 गटारीचे सांडपाणी रस्त्यावर! रस्त्यावर तलाव सदृश नागरिकांचा कसरती प्रवास. रमजीपुर रस्त्यावरील प्रकार !  रावेर सा.बा.विभागाने लक्ष देण्याची म...

 गटारीचे सांडपाणी रस्त्यावर! रस्त्यावर तलाव सदृश नागरिकांचा कसरती प्रवास. रमजीपुर रस्त्यावरील प्रकार ! रावेर सा.बा.विभागाने लक्ष देण्याची मागणी  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील रसलपुर गावाबाहेरुन असलेल्या रावेर रसलपुर रमजीपुर मुंजलवाडी डांबरी रस्त्यावर रसलपुर आश्रमशाळेच्या नवीन प्लॉट परीसराला लागून असलेल्या रमजीपुर रस्त्यावर रसलपुर गावातील वरील वस्तीमधील गटारीचे सांडपाणी गेल्या 3 महिन्यांपासून रस्त्यावर वाहत आहे हे सांडपाणी रस्त्यावर साचून मोठा खड्डा पडला आहे व सदरील गटारीचे साचले आहे आणि सांडपाण्यामुळे हा भला मोठा खड्डा भरगच्च भरलेला आहे त्या ठिकाणी तलाव सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे या गढूळ सांडपाण्यातूनच मुंजलवाडी,रमजीपुर करासह शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ,वाहन धारकांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे सदर खड्डा चुकवत असतांना असंख्य लहान मोठे अपघात त्या ठिकाणी घडत आहेत 

रसलपुर गावाबाहेरुन गेलेल्या या मुख्य डांबरी रस्त्यावर  गटारीचे सांडपाणी गेल्या 3 महिन्यांपासून रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी, डासांची उत्पत्ती, लहान मुले /वृद्धांना घसरण्याचा धोका आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर च्या संबंधित अधिकारी यांनी याची तातडीने दखल घेऊन 


या रस्त्यावर असलेला सांडपाण्यामुळे बनलेला हा जीवघेणा खड्डा बुजवावा  तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रमजीपुर येथील नागरिकांनी केली आहे. यासोबतच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 44 नुसार सार्वजनिक स्वच्छता ठेवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावर वाहत असलेले सांडपाणी बंदिस्त करून नाल्यात सोडण्याची व्यवस्था करावी. अन्यथा  याबाबत पंचायत समिती रावेर व जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे रमजीपुर येथील रहिवासी तथा सु‌ज्ञ नागरिकांनी सांगितले

No comments