धक्कादायक! ग्रामीण भागाला पाणी देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपासमार..६ महिन्यांपासून मानधन रखडल्याने १ जूनपासून 'पूर्ण वेळ काम बंद ...
धक्कादायक! ग्रामीण भागाला पाणी देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपासमार..६ महिन्यांपासून मानधन रखडल्याने १ जूनपासून 'पूर्ण वेळ काम बंद आंदोलन'..
अहिल्यानगर जिल्ह्यातील 'BRC' गट व समूह समन्वयकांचा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांना निर्वाणीचा इशारा
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :- राज्यातील ग्रामीण भागातील अतिशय महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना,स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन मिशन या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर गेल्या ६ महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे.पंचायत समिती अंतर्गत (गट संसाधन केंद्र) पाणी व स्वच्छता विभागातील ब्लॉक रिसोर्स सेंटर (BRC) कंत्राटी कर्मचाऱ्यांचे (गट समन्वयक व समूह समन्वयक) मागील डिसेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या ५ महिन्यांचे आणि चालू मे महिन्याचे असे एकूण ६ महिन्यांचे हक्काचे मासिक मानधन रखडले आहे.या प्रशासकीय उदासीनतेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी १ जून २०२६ पासून 'पूर्ण वेळ काम बंद आंदोलन' छेडण्याचा थेट इशारा पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री श्री.गुलाबराव पाटील यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा देणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन रखडल्यामुळे त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे.आजच्या वाढत्या महागाईच्या काळात घरभाडे,मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन गरजा भागवणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना अशक्य झाले आहे.वारंवार तोंडी आणि लेखी पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने मिळत असल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
असे असेल आंदोलनाचे टप्पे (काम बंद आंदोलन रूपरेषा):
टप्पा - १ (दिनांक ०१ जून २०२६ ते ०५ जून २०२६): जिल्हा परिषद, अहिल्यानगर समोर भव्य धरणे आंदोलन.
टप्पा - २ (दिनांक ०८ जून २०२६): राज्यस्तरीय कंत्राटी कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव ते श्री. गुलाबराव पाटील साहेब (मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता) यांच्या निवासस्थानापर्यंत 'पायी यात्रा' व निवासस्थानासमोर धरणे
आंदोलन करणार.
टप्पा - ३ (दिनांक ०९ जून २०२६ पासून): मानधन मिळेपर्यंत जिल्हा स्तरावर राज्यव्यापी 'काम बंद' आंदोलन सुरूच राहणार.
आंदोलनात सहभागी असणाऱ्या २६ लढवय्या कर्मचाऱ्यांची अधिकृत यादी:
या आंदोलनामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सर्व २६ कंत्राटी कर्मचारी अधिकृत स्वाक्षरीसह उतरले आहेत. त्यांची संपूर्ण नावे, पदे आणि तालुके खालीलप्रमाणे:
१. श्रीम. मोरे मंगल गोपीनाथ – गट समन्वयक (श्रीगोंदा)
२. श्री. कुऱ्हे हरिश्चंद्र भाऊसाहेब – समूह समन्वयक (श्रीगोंदा) (जिल्हा सचिव)
३. श्री. ढेरंगे संदीप रामदास – गट समन्वयक (संगमनेर)
४. श्री. पारखे योगेश गणपत – समूह समन्वयक (संगमनेर)
५. श्री. बेल्हेकर लहानु नामदेव – गट समन्वयक (राहुरी)
६. श्रीम. पालवे कांचन कारभारी – समूह समन्वयक (राहुरी)
७. श्री. जगधने सोमनाथ सांडु – गट समन्वयक (नेवासा)
८. श्री. सोनवणे संतोष रमेश – समूह समन्वयक (नेवासा)
९. श्री. मिरपगार सुहास विद्यानंद – समूह समन्वयक (नेवासा)
१०. श्री. आहेर सागर ज्ञानदेव – गट समन्वयक (राहाता)
११. श्री. बनसोडे भारत गोरक्षनाथ – समूह समन्वयक (राहाता)
१२. श्री. थोरात अरुण प्रभाकर – समूह समन्वयक (राहाता)
१३. श्री. खरात येशुदास बाबुराव – समूह समन्वयक (शेवगाव) (जिल्हा अध्यक्ष)
१४. श्री. वल्हे सोपान नवनाथ – समूह समन्वयक (शेवगाव)
१५. श्रीम. पवार वंदना भिवसेन – समूह समन्वयक (शेवगाव)
१६. श्री. खेडकर अशोक नवनाथ – समूह समन्वयक (पाथर्डी)
१७. श्री. कांडेकर बाळासाहेब दामोधर – समूह समन्वयक (पाथर्डी)
१८. श्री. तागडकर संदीप धोंडीराम – गट समन्वयक (नगर)
१९. श्रीम. शिंदे मनिषा कल्याणराव – समूह समन्वयक (नगर)
२०. श्री. बोरुडे सतिश शिवाजी – समूह समन्वयक (जामखेड)
२१. श्री. बाराहाते किरण भाऊसाहेब – गट समन्वयक (श्रीरामपूर)
२२. श्री. पाटोळे तुकाराम बाळासाहेब – समूह समन्वयक (पारनेर)
२३. श्री. बोरुडे सचिन सुनील – समूह समन्वयक (कोपरगाव)
२४. श्री. कडलग अशोक विठ्ठल – समूह समन्वयक (अकोले)
२५. श्री. ब्राम्हणे निलेश अण्णासाहेब – समूह समन्वयक (अकोले)
२६. श्री. वायमारे जनक अश्रुबा – गट समन्वयक (कर्जत)
प्रशासकीय कामकाजाला फटका बसल्यास शासनच जबाबदार!
या आंदोलना दरम्यान पाणी व स्वच्छता विभागाचे सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प राहणार असून, शासकीय कामाचे जे काही नुकसान किंवा दिरंगाई होईल, त्याला सर्वस्वी शासन आणि जिल्हा/तालुका प्रशासन जबाबदार राहील, असा थेट इशारा जिल्हा सचिव हरिश्चंद्र भाऊसाहेब कुन्हे आणि जिल्हा अध्यक्ष येशुदास बाबुराव खरात यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

No comments