adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बालपणापासून देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या फैजपूरच्या आर्यन कपलेची अग्निवीर टेक्निशियन पदासाठी निवड परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव; युवकांसाठी ठरला प्रेरणादायी आदर्श

 बालपणापासून देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या फैजपूरच्या आर्यन कपलेची अग्निवीर टेक्निशियन पदासाठी निवड परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव; युवकांस...

 बालपणापासून देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या फैजपूरच्या आर्यन कपलेची अग्निवीर टेक्निशियन पदासाठी निवड

परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव; युवकांसाठी ठरला प्रेरणादायी आदर्श 


फैजपूर (इदू पिंजारी)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील न्हावी दरवाजा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी राजू भगवान कपले यांचे सुपुत्र आर्यन राजू कपले यांची भारतीय सैन्याच्या अग्निवीर टेक्निशियन पदासाठी निवड झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अग्निवीर भरतीच्या निवड यादीत त्यांचे नाव झळकल्याने कपले कुटुंबासह संपूर्ण फैजपूर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लहानपणापासूनच देशसेवेची प्रबळ आवड आणि भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या आर्यन यांनी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि ध्येयाप्रती असलेल्या समर्पणामुळे त्यांची भारतीय सैन्यातील अग्निवीर टेक्निशियन पदासाठी निवड झाली आहे.

आर्यन यांच्या या यशामुळे परिसरातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सैन्यात भरती होण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या निवडीची बातमी समजताच नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

देशसेवेची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना आर्यन यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याला दिले. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून भविष्यात देशसेवेत उल्लेखनीय कार्य करून परिसराचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

No comments