गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याचे मुस्लिम कामगार समाजाचे फैजपूर प्रांत अधिकारींना निवेदन इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवा...
गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याचे मुस्लिम कामगार समाजाचे फैजपूर प्रांत अधिकारींना निवेदन
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर: शहरात आज कामगार संघटना मुस्लिम समाजाच्या वतीने महत्त्वाचे निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे गायीला 'राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी मुस्लिम समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही मागणी लावून धरली. गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळावा, यासाठी प्रशासनाकडे अधिकृत निवेदन सोपवण्यात आले. या वेळी .श्रमिक कोहेनूर कामगार संघटना के अध्यक्ष शाकीर मलिक मनोगत व्यक्त करताना सांगितले की गायला भारतात हिंदू सनातन धर्मात मोठे मान व सन्मान गायला माता मानले जात आहे केंद्र और राज्य सरकार ने गाय ला लवकरच राष्ट्रीय पशु घोषित करावे अशी मागणी केली या वेळी कामगार संघटना पदाधिकारी यूनुस बाबूलाल पिंजारी आसिफ कमरुद्दीन इरफान शेख मोहसीन मिस्तरी लुकमान शेख अब्दुल कादिर अल्ताफ शेख जफर अली तौसीफ खान शाकिर शेख असंख्य कामगार मुस्लिम युवा यावेळी प्रांत कार्यालयावर उपस्थित होते

No comments